“जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार”

मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकार नियुक्त समितीने पदवी स्तरावर प्रथम, द्वितीय वर्षांच्या आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर प्रथम वर्षांची परीक्षा न घेता केवळ अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची शिफारस केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणाही केली होती.

युवा सेनेने परीक्षा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर सामंत यांनी यूजीसीला परीक्षा घेता येणार नसल्याने श्रेणी देण्याच्या मागणीचे पत्र लिहिलं होतं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सामंत यांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परीक्षेबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार, असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

-‘इंडिया’ नको ‘भारत’ नावानेच देशाची ओळख व्हावी; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

-ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?, जाणून घ्या कारण

-रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

-कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार