महाराष्ट्र मुंबई

‘असंगाशी संग केल्यावर काय वेगळ होणार?’; भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवून एक जागा कमी लढावी आणि आघाडीधर्म तरी पाळावा. काँग्रेस जे करत आहे त्याला राजकारण म्हणतात. असंगाशी संग केल्यावर काय वेगळं होणार, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आज मदर्स डे आहे. सोनिया मतोश्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजच्या सारखा उत्तम दिवस नाही. पुण्य मिळेल, आशीर्वादही मिळेल, असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

राज्यातील विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. मात्र 9 जागांसाठी 10 उमेदवार उभे केल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेत माघार कोण घेणार यावरून वाद सुरू आहेत.

काँग्रेसनं दोन उमेदवार उभे केल्यानं निवडणूक ही अटळ मानली जात आहे. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”

-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा

-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी

-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!

-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत