झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला

मुंबई | भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून कोरोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसं अपयशी ठरलं आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावरून आता भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे.

कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडतायत, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही. लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही. झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही. मात्र विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा मात्र पुरेपूर आहे, असं म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोनाशी निकराने लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. तरीही भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून, कोरोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

-रामजन्मभूमीचं सपाटीकरण करत असताना सापडल्या प्राचीन मूर्ती-शिवलिंग; वाचा संपूर्ण प्रकार

-महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!

-उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल

-“नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”

-कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा धक्का; आवडता लोकगीत गायक हिरावला!