“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”

मुंबई | जेव्हा मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा कोरोनावर बोलणारे राहुल गांधी पहिले नेते होते, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं होत

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

मोदी सरकार ट्रम्प यांचे स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा कोरोनावर बोलणारे राहुल गांधी हे पहिले नेते होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘लॉक डाउन ची गरज काय?’ असं विचारणारे पाहिलेही तेच होते. तर ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिलेच कॅबिनेट मंत्रीही तुम्हीच, असं म्हणत भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय.

दरम्यान, राहुल गांधी जे बोलत आहेत, ती वस्तुस्थिती आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांनी मांडलेल्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असंही आव्हाड म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

-रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस

-‘मी तुम्हाला शेवटची ताकीद देतोय’; अरविंद केजरीवाल संतापले

-रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं- अमोल कोल्हे

-पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या; राजेंद्र विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी

-विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू