“देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?”

मुंबई | देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस आहे. ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

-म्हण…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील

-मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

-प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

-“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”