दारूची दुकान उघडली पण जिम अजूनही बंद हे दुर्दैवी; फडणवीसांचा राज ठाकरेंच्या सूरात सूर

मुंबई | कोरोनामुळे लॉकडाऊनपासून राज्यातील जिम चालू नाहीत. त्यामुळे जिम चालक-मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत जिम चालू करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यावेळी ठाकरेंनीही  त्यांना जिम चालू  करा, बघू पुढं काय होतं ते, असं म्हणत एकप्रकारे परवानगी दिली होती.

राज ठाकरे जिम चालक आणि मालकांसाठी सरकार विरोधात जात मैदानात उतरले होते. त्यापाठोपाठ आता विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या सूरात सूर मिसळत जिम चालू करायला हव्यात असं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकलं पाहिजे. हा आपला विचार असेल कदाचित पण राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही?, खरं तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली असल्याचं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकरावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातील जिमचालकांनी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सूचविले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घायलाची असेल तर तीही करता येईल. पण, राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अधिकारी बदल्यांच्या नावाखाली महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची कमाई, सीआयडी चौकशी करा; पाटलांचा गंभीर आरोप

पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, पवारांचीही भेट घेण्याची शक्यता!

संजय दत्तला कर्करोगाचं निदान झाल्यावर पत्नी मान्यताची भावनिक पोस्ट; म्हणाली…

“अजित पवारांनी आणि पाटलांनी बाकी पक्षांच्या आमदारांची चिंता नका करू नये, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा”

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तसं करणार नाही, भाजपने हा वाद सुरू केला; मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण