ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

जळगाव | येत्या 21 मे रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींना फोन करून विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यसभेसाठी महाराष्ट्र भाजपकडून माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण राष्ट्रीय राजकारणात मला रस नसल्याने मी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला. राज्याच्या राजकारणात मला अधिक रस आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

मला राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. तशी इच्छा मी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली असून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

दरम्यान, खडसे यांनी भाजपच्या विस्तारासाठी 40 वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त करणं योग्य आहे. पक्षाने त्यांच्या नावाचा विचार करावा असं मला वाटतं, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”

-IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण

-दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी

-‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

-आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार