‘या’ भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या; गेल्या 48 तासांत दुसरा हल्ला!

श्रीनगर | जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हालचाली वाढू लागल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वेसू गावचे सरपंच आणि भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

सरपंच सज्जाद अहमद खांडे आपल्या घराबाहेर बसलेले असताना दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी सज्जाद यांच्यावर गोळीबार चालू केला. गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारापूर्वी डॉक्टरांनी सरपंचांना मृत घोषित केलं.

गेल्या 48 तासांत काश्मीर खोऱ्यातील दोन सरपंचांवर हल्ले झाले आहेत. 4 ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील मिरबाजारच्या अखरण भागतील सरपंच पीर आरिफ अहमद शहा यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात बांदीपोरा भागातील भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्यांचे वडील व भाऊ यांनाही दहशतवाद्यांनी ठार केलं आहे. अनंतनाग जिल्ह्यातील सरपंच अजय पंडित यांनादेखील 8 जून रोजी दहशतवाद्यांनी ठार केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट

‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला