“पंतप्रधानपद सोडा… पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”

मुंबई | शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवण्याचा मनसुबा बोलून दाखवला.

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. नितेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

पंतप्रधानपद लांबच राहिलं. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर स्वत:चा महापौर तरी बसवून दाखवावा, असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही मजबूर नाही तर मजबूत आहोत, महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

-‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

-राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी