पुणे | पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध कामांचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून देण्यात आलेली बँक गँरंटी बोगस निघाल्याचं प्रकरण भाजप नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe)यांनी लावून धरलं होतं. तुषार कामठे यांनी पहिल्यांदा या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत आवाज उठवला होता.
तुषार कामठे यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. यामुळं तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर लावल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत.
तुषार कामठे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक आहेत. आपण आज दाखवून दिले जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना.
अजित पवार यांच्या नि:पक्षपाती निर्णयामुळं ‘सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या घोटाळेबाज कंपनीवर कुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल दादा आपले मनस्वी आभार, असं तुषार कामठे म्हणाले आहेत.
पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावल्याने शहरभर चर्चा सुरू झाल्या आहेत.
दादा, तुमचे खूप आभार !आपण आज दाखवून दिलं जे चुकीचे आहे,ते चुकीचंच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना, असं त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी”
“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!