“देशावर आलेल्या कठीण प्रसंगात देखील काही जणांना राजकारण सुचत आहे”

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. ही टीका भाजप नेते आणि आमदार राम कदम यांना चांगलीच झोंबली आहे. त्यांनीही ट्विट करून राऊत यांना सुनावलं आहे.

देशावर आलेल्या कठीण प्रसंगात देखील काही जणांना राजकारण सुचत आहे. अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन योग्य पावलं उचलणं गरजेचं असतं. मात्र अशाही परिस्थितीत काही लोकांना टीका करणं आणि आरोप-प्रत्यारोप करणं हेच सुचत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. तसंच करोडो लोखांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हे तरी लक्षात घ्या, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था ही केंद्राबरोबरच राज्याची देखील जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य अंंमलबजावणी करण्यापासून तुम्हा कुणी रोखलं आहे? असा सवालही त्यांनी राऊतांना केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात जनतेने थाळ्या, घंटा, शंख वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावरून राऊत यांनीमोदींवर निशाणा साधला. आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलं तर असेच होणार, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. याच टीकेला राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-संपूर्ण राज्यात संचारबंदी, प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद!; राज्य सरकारचा मोठा निर्णय

“मला पोलीस सुरक्षा नको, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राला त्यांची जास्त गरज आहे”

-कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावं म्हणून शरद पवारांनी दिला हा संदेश

-“सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी”

-“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”