आपल्या पाळीव प्राण्यांचा त्याग करु नका, हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचं आवाहन

मुंबई |  जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामध्ये पाळीव प्राण्यांमुळे कोरोनाची लागण होते, या अफवेमुळे नागरिकांनी घरातील पाळीव प्राणी सोडून दिले आहेत. यावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जी.प. सदस्या अंकिता पाटील यांनी या संदर्भात पोस्ट करून जनतेला असं न करण्याचे आवाहन केलं आहे.

मांजर आणि कुत्र्यांमुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग होतो ही अत्यंत चुकीची माहिती आहे. कृपया आपल्या पाळीव प्राण्यांचा आणि भटक्या कुत्र्यांचा आणि मांजरींचा त्याग करू नका. ते या विषाणूचे वाहक नसल्याचं अंकिता पाटील यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहून खुप निराशा झाली. सामाजिक अंतर हे आपल्या प्राण्यांनसाठी नाही. सावधगिरी बाळगा, काळजी घ्या पण अफवांण वरती विश्वास ठेऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-गाडगेबाबांनी सांगितलेला माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

-औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कारण ‘त्या’ महिलेनं केली सात दिवसात कोरोनावर मात

-सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाने घेतला दुसरा बळी

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पुर्ण करुया, भारताला कोरोनापोसून वाचवूया”

-“विराट इतर खेळाडूंसारखा नौटंकी करत नाही, क्रिकेटप्रती त्याला आदर आहे”