‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं

मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, नागपुरात हे अधिवेशन होत होतं, पण यावेळी कोरोना आणि मुख्यमंत्री कारणाने मुंबईतच हे अधिवेशन घेण्यात आलं आहे. याला उद्धव ठाकरे उपस्थित राहु शकले नाहीत. यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपमधील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सवाल उपस्थित केले जात आहे. यावरून आव्हाडांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? ती आपली संस्कृती नाही. त्याचबरोबर कुणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी बोलणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी या मुद्द्यावरुन रान उठवायला सुरु केली आहे.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार नसतील तर कसं होणार?, असा प्रश्न भाजपचे नेते विचारत आहेत. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांनी गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यांचे आजारपण हे चिंताजनक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार तुर्तास दुसऱ्या कोणाकडे तरी सांभाळायला द्यावा, अशी मागणी पहिल्यांदा चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर 

“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील” 

विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले… 

“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही” 

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले