मुंबई | विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता एकनाथ शिंदे 11 आमदारांना नाहीतर 25 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले असल्याची माहिती समोर आलीये.
गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती.
दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे.
सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे 134 झालं आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडेल, अशी चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता!
“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?
मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले
“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”
मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा