सोलापूर : ‘शरद पवार तुम्ही 15 वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्या’, असं थेट आव्हान गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत शरद पवारांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपची ‘महाजनादेश यात्रा’ पार पडली.
महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापुरात झाला. यावेळी भाजपने सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित शहांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलं.
सोलापुरातील सभेत अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपात प्रवेश केला.
अमित शहांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. हे दोन्ही पक्ष राजकारणाला घराणेशाही समजतात असा टोलाही अमित शहांनी लगावला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आलं, अजित पवार हे जलसंपदा मंत्री झाले. मात्र 74 हजार कोटीचा खर्च करुनही एक थेंब पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 22,000 गावांमध्ये पाणी पोहोचवलं आहे, असं म्हणत अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या-
मेधा पाटकरांच्या उपोषणाचा सलग 9वा दिवस; प्रकृती खालावली – https://t.co/iesL6NHJq9 @Medha_patakar #NarmadaBachao
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो- नितीन गडकरी
https://t.co/hcYU96KNyv #म— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
शिव ठाकरे ठरला ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता – https://t.co/kGZ20pvBdO @Shiv_Thackre #BigBossMarathi2
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019