धाकधूक वाढली… भाजप 25 विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार???

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने राज्यात सर्व्हे केला आहे. स्थानिक राजकारण, जनसंपर्काचा अभाव, सरकारच्या कामांची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने न करणं या आणि अशा विविध निकषांवर 25 आमदारांचं तिकीट भाजप कापणार असल्याची माहिती आहे. 

भाजपच्या या धक्कातंत्रामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच भाजप आमदारांची धाधूक वाढली आहे. या 25 आमदारांमध्ये कुणाचा नंबर लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीला भाजपने विद्यमान 8 खासदारांचं तिकीट कापलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेलाही भाजप 25 आमदारांचं तिकीट कापणार असल्याची माहिती कळतीये.

भाजप शिवसेना युतीचं आणखी तळ्यात मळ्या आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उमेदवार देताना बंडखोरांचा सामना दोन्ही पक्षांना करावा लागणार आहे.

दरम्यान, आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ज्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-