देश

उत्तराखंडच्या भाजप आमदाराचा प्रताप; 4 बंदुका हातात घेऊन डान्स व्हायरल

उत्तराखंड| भाजपचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन हे नाव सध्या भलतंच चर्चेत आहे. 4 बंदुका हातात घेऊन उत्तराखंडचे भाजपचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांचा डान्स सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत दारूच्या नशेत तल्लीन होऊन कुंवर प्रणव सिंह हातात चार-चार बंदुका घेऊन नाचताना दिसत आहेत.

फक्त उत्तराखंडमध्येच नाही तर संपुर्ण भारतात असं कुणी करू शकत नाही, असं म्हणत चॅम्पियन हे तोंडात बंदुक घेत डान्स करताना दिसत आहेत. तर आजूबाजूचे त्यांचे समर्थक त्यांना प्रोत्साहित करताना दिसत आहेत. 

कुंवर प्रणव सिंह यांच्या पायाचं ऑपरेशन यशस्वी झालं. आणि त्याच सेलिब्रेशन ते आपल्या समर्थकांसोबत करत होते. यावेळी हा सगळा प्रकार घडला.

जे लोकप्रतिनिधींनी करायला नको तेच कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन हे सातत्याने करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

दरम्यान, कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे त्यांची पक्षातून हाकलपट्टीही करण्यात आली होती. आताही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं भाजपकडून सांगण्यात येतंय.

IMPIMP