मुंबई | सध्या मुंबईत विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशन ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आणि इपेरिकल डाटावर जबरदस्त चर्चा झाली. त्यावर आता माजी मंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
वारंवार तोंडावर आपटून सुद्धा विचारवंत उर्फ ट्रोलर प्रा. हरी नरके यांचे निष्ठापूजन सुरूच आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राची-ओबीसी समाजाची दिशाभूल ते करीत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
2010 च्या कृष्णमूर्ती निकालासंदर्भात बोलताना ते हे सांगत नाही की 2010 ते 2014 या काळात राज्यात कुणाचं सरकार होतं?, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे.
SECC सर्वेबाबत कवडीची माहिती नसल्यानेच हा बुद्धिभेद त्यांनी चालविला आहे. त्यांची प्राथमिकता ओबीसी समाज नाही तर आपल्या राजकीय गुरूचा बचाव असल्याचं देखील बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.
आम्ही पुन्हा एकदा सांगतो की, आम्ही जो डेटा मागितला तो 50 टक्यावरील आरक्षण टिकविण्यासाठी आहे. आता तर त्या खालचं पण गेलं आहे, अशी टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे.
पुन्हा सांगतो ट्रिपल टेस्ट ही पहिल्यांदा 13 डिसेंबर 2019ला न्यायालयाने सांगितली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकारने झोपा काढल्या आहेत, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
दरम्यान, ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला, त्याचं उत्तर द्यायचं नसल्यानंच ते सातत्यानं दिशाभूल करीत असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
“यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, रिश्ते में ये हमारा बाप लगता है”
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल