Top news महाराष्ट्र राजकारण सातारा

“मी शरद पवारांचं राजकारण नासवलंय, पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे…”

sharad pawar e1646045639512
Photo Credit- Facebook/ Sharad Pawar

सातारा | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष वाढलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या टीकेला भाजप नेते जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच भाजप आमदार जयकुमार गोरेंचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आता भाजप नेते आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. माण-खटाव मतदारसंघाचे आमदार असणारे गोरे हे पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात.

माण खटाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निधी आणला आहे. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. माझ्याच काळात माण-खटावमध्ये काम झाली आहेत, असं गोरे म्हणाले आहेत.

गोरेंनी त्यांचे विरोधक प्रभाकर देशमुखांवर जोरदार टीका केली आहे. माण मतदारसंघाचे नव्हे तर मी शरद पवारांचे राजकारण नासवले आहे, असं वक्तव्य गोरेंनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

शरद पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे देशमुख भाजपमध्ये येण्यासाठी फडणवीसांच्या मागं लागले होते, असा गौप्यस्फोट गोरेंनी केला आहे. देशमुखांनी पैशाच्या जोरावर 88 हजार मतदान मिळवलं तर मी कामाच्या बळावर निवडून आलो, असंही गोरे म्हणाले आहेत.

देशमुख हे जातीपातीचं राजकारण करत आहेत. कोरोना काळात ते कुलुपबंद घरात बसले होते. मी मतदारसंघात फिरून जनतेला धीर दिला आहे. देशमुखांच्या बोलण्यावर इथली जनता विश्वास ठेवणार नाही, असं गोरे म्हणाले आहेत.

माझ्या नेतृत्वातच मतदारसंघात पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली. सिमेंट बंधाऱ्यांचे वाढलेले प्रमाण हे मतदारसंघाच्या विकासाचं लक्षणं आहे, असं गोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, जयकुमार गोरे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत असं वक्तव्य पडळकरांनी या कार्यक्रमात केलं आहे. शरद पवारांवरील टीकेनंतर आता गोरे यांना राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “राज्यपाल महोदय, छत्रपतींचा अपमान खपवून घेणार नाही, तुमच्या ‘चहा’ छाप सैनिकांनी…”

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा”