“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणावर बऱ्याच कालावधीपासून प्रभाव असणारं व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ओळखलं जातं. शरद पवार यांची राजकीय काराकिर्द प्रदीर्घ आहे.

राज्याच्या सर्वांगिण विकासात आणि राज्याच्या जडणघडणीत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्याच बोटाला पकडून शरद पवार राजकारणात सक्रिय झाले.

चव्हाणांनंतर त्यांच्या वैचारिक आणि राजकिय वारसदारांमध्ये शरद पवार यांचं नाव येतं. शरद पवार हे सध्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष देखील आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर हे अनेक राजकीय घडामोडींचं प्रमुख केंद्र आहे. अशात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित राहण्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

मंगश चव्हाण यांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल देखील वक्तव्य केलं आहे. चव्हाणं यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

मी आजपर्यंत कधी पवारांच्या सावलीत उभारलो नाही. भविष्यात देखील मला त्यांच्या सावलीत उभारण्याची गरज पडणार नाही, असं वक्तव्य मंंगेश चव्हाण यांनी केलं आहे.

मी इतका मोठा नेता नाही की शरद पवारांची भेट घेईल. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते पवारांची भेट घेतील. मी कशाला घेवू?, असा प्रतिप्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे.

दरम्यान, वाय. बी. चव्हाण सभागृहात एका कामानिमीत्त आलो होतो असं चव्हाण यांनी सांगितलं आहे. तरीही चव्हाण यांच्या उपस्थितीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल