“चाटायचं असेल तेव्हा पवारसाहेब आणि चावायचं असेल तेव्हा…”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर प्रचंड टीका केली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षात आता या पत्रकार परिषदेनं नव्या वादाला सुरूवात केली आहे. राऊत यांनी अनेक विषयांना हात घालत भाजपवर टीका केली. त्यानंतर आता भाजपकडून राऊत यांना प्रत्यूत्तर मिळायला सुरूवात झाली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब, याला म्हणतात लोंबत्या राऊत, अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी मला मदत करण्यास सांगण्यात आलं मी नाही म्हणालो तर माझ्या कुटुंबियांना त्रास दिल्याचं राऊत म्हणाले आहेत. अशातच आता राऊत यांच्या टीकेवर नितेश राणेंनी जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांचा आधार घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. बहूचर्चित पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा हा भाजपला नेत्यांच्या प्रकल्पात गुंतवण्यात आल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या सर्व आरोपानंतर राज्यात राजकीय वाद शिगेवर पोहचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला