‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | माननीय मुख्यमंत्री रोजच टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच आहे, असं म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आमच्या दाढ्या वाढल्यात. मात्र मुख्यमंत्री रोजच टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. खरं म्हणजे नाभिक समाजावर अन्याय करण्याचं काहीच कारण नाही, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

एकीकडे तुम्ही मॉल, हॉटेल आणि इतर व्यवसायांना पारवानगी देता. आणि दुसरीकडे एका टक्क्यापेक्षाही कमी असलेल्या नाभिक समाजावर अन्याय का केला जात आहे?, असा प्रश्न प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

दरम्यान, ज्याप्रकारे इतर व्यवसायांसाठी नवे नियम लावून त्यांना परवानगी देण्यात आली त्याच प्रकारे करोनाचा धोका टाकण्यासंदर्भातील नवे निमय नाभिक समाजासाठी जारी करुन त्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, असंही लाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”

-‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

-पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!

-दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही

-झुंज अपयशी… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!