भाजपच्या या आमदारावर खोट्या सह्या दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड | बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी केज पासून जवळच स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी उभारली. या सूतगिरणीमधील गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना संचालक पदावर नियुक्त केलं होतं. खोट्या सह्या दाखवल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठोंबरे पती पत्नीवर केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने या विरोधात केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. फिर्यादींनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ. विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फौजदारी संहिता कलम 153(3)अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

आता मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गु्न्हा दाखल  झाल्यानंतर त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-