भाजपच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांना बनवलं थेट पंतप्रधान, अन् सभागृहात पिकला हशा

मुंबई | सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजपच्या बुलढाण्याच्या आमदार श्वेता महाले यांची सभागृहात बोलताना घोडचुक केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला आहे.

श्वेता महाले सभागृहात पुरवणी प्रश्न मांडत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख माननीय पंतप्रधान असा केला. त्यामुळे सभागृहातील सर्वजण चक्रावले. तसेच सभागृहात हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं.

बुलढाणा जिल्ह्यात धान्य साठवण्यासाठी पुरेसे गोदामं नाहीत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात गोदामांची आवश्यकता आहे. तरी माननीय पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात 16 कलमी कार्यक्रम आणला आहे, असं श्वेता महाले बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, श्वेता महाले यांनी केलेल्या या घोडचुकीमुळे  त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भाजप आमदाराला पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्री यांच्यातील फरक कळत नाही का? असे सवाल विचारले जाऊ लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहताच मराठीचे ‘मारक’ मेहता; मनसेचं टीकास्र

-सोडून काँग्रेसचा हात, हार्दिक पटेल देणार का केजरीवालांना साथ?

-ज्यांना शक्य आहे, त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी या; देवदर्शनात राजकारण करू नका- उद्धव ठाकरे

-“सामनातील भाषा आपली पितृभाषा आहे; ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही”

-संजय राऊत आमच्या घरचा माणूस, तर नरेंद्र मोदी मोठे बंधू- उध्दव ठाकरे