पुणे महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी आमदार स्नेहलता कोल्हेंचा राजीनामा

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाला मराठा आमदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय. जनभावनांचा आदर करत अनेक लोकप्रतिनिधी आपल्या पदांचा राजीनामा देत आहेत. त्यात सत्ताधारी भाजपच्या आमदारांचा देखील समावेश आहे.

आता भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावे त्यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा लिहिला आहे. खालील फोटोत आपण हा राजीनामा पाहू शकता.

Snehlata Kolhe - मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार स्नेहलता कोल्हेंचा राजीनामा

स्नेहलता कोल्हे या कोपरगावमधून निवडून आल्या होत्या. मराठा क्रांती मोर्चाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि समाजामध्ये मराठा आमदारांविषयी निर्माण होणारी चीड पाहून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

आतापर्यंत एकूण 8 मराठा आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत, असं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्पष्ट केलंय. 

IMPIMP