मुंबई | मागील काही दिवसांपासून सुरू राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर दोन्ही बाजूचे नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता राजकीय पटलासह ट्विटर वाॅर देखील होत असल्याचं पहायला मिळतंय.
भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं.
निलेश राणे यांच्या टीकेनंतर आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स एक्स्पायर झाला असेल, तर त्यांच्या आसपासचे अधिकारी कसं काम करतात हे दिसून येतं, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
काही पक्षांचे विचार एक्स्पायर झाले आहेत. तरी काही प्रमाणात ते निवडून येतात, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी मागील काही दिवसांपासून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं
संसदेत सोनिया गांधींची भाजपवर कडाडून टीका, म्हणाल्या…
“…तर काँग्रेस भाजपला 2024 मध्ये तगडं आव्हान देऊ शकतं”
“नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…”
Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर