औरंगाबाद महाराष्ट्र

लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

बीड | कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सांगवी पाटण प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेलं असताना आमदार सुरेश धस यांनी तिथे जाऊन लोकांशी संवाद साधला. याप्रकरणी भाजप आमदार धस यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हाबंदीचा आदेश डावलून ऊसतोड मजुरांना मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा झाला होता. बीड जिल्ह्यातील सांगवी पाटण येथे एकाच कुटुंबातील 7 व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचं स्पष्ट झालं. जिल्हा प्रशासनाने त्या भागातील 5 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.

धस स्वतः सांगवी पाटण गावात गेले. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याविरोधात तक्रार केल्याचं कळतंय.

मी प्रशासनाला दोष देणार नाही. सरकारचं धोरणच चुकीचं असून लोकप्रतिनिधीलाही त्यामध्ये घेतले आहे. सांगवी पाटणमधील लोक कोरोनाबधितांमुळे घाबरले होते. लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेलो लोकांना समजावून सांगितले, त्यांच्याशी चर्चा केली तर आमच्यावरच गुन्हा नोंद केला, असं सुरेश धस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”

-…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात

-…अन्यथा त्यांना कोरोनाविरोधात लढणारे योद्धे म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल