Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, BJP आमदाराचं काँग्रेसला मतदान

जयपूर | राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय खेळी दाखवली आहे. भाजप आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केलं आहे.

घनश्याम तिवारी यांना जास्त मते मिळाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदाराने आपल्या पसंतीच्या विरोधात जाऊन तिवारींना मत दिल्याची माहिती आहे.

राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुरजेवाला यांना तीन जागांसाठी उमेदवारी दिली आहे. तिघेही जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

मतदानादरम्यान जेडीएसचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी क्रॉस व्होटिंग करून त्यांच्या पक्षाऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं आहे. आमदार गौडा यांनीही काँग्रेसला मतदान केल्याचं उघडपणे सांगितलं.

देशातील चार राज्यांतील 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थान (Rajasthan), कर्नाटक (Karnataka), हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे.

विविध पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये (MLAs in hotels And Resorts) ठेवले आहे, तर निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे आणि संपूर्ण मतदानाची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल” 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये” 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! 

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ 

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत