मुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज महाविकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी होणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.
नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळ जवळ एक तास चर्चा झाली. चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
पवार आणि चिखलीकर यांच्यात काय चर्चा झाली याबाबत तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, प्रतापराव चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“कुणी कुणाशी युती करावी, हे सांगणं आमचं काम नाही” – https://t.co/gDjoYBKR01 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“मंत्रिमंडळ विस्तारात कोणतंही खातं मिळालं तर मी चांगलं काम करेल” – https://t.co/kuRprLP6LV @RealBacchuKadu
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही” – https://t.co/pjQQS21vza @MeNarayanRane @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019