“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती

मुंबई | अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) हे गेली अनेक वर्षे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Indian National Congress) पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या राज्यांत आपल्या पक्षाची घौडदौड सुरु केली आहे.

दिल्लीच्या निवडणुकांत आपने भाजपला चांगलाच धक्का दिला. गेली कित्येक वर्षे काँग्रेसच्या अधिपत्यात असलेले पंजाब (Punjab) राज्य आपने (AAP) गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्या हातातून काढून घेतले.

पंजाब निवडणुकांत दस्तूर ए खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारात उतरले होते. तरी भाजपचा पंजाबात सुपडा साफ झाला. त्यामुळे ती हार भाजपच्या वर्मीच लागली आहे.

आता दिल्लीचे भाजप खासदार परवेश साहिब सिंह (Parvesh Sahib Singh) यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला एक विनंती केली आहे.

हा माणूस खूर्चीसाठी एवढा वेडा झाला आहे की, हा काय खोटे बोलतो याचे यालाच माहित नाही. हा काय पाप करतोय याचे यालात माहित नाही. देवाने याला तीन वेळा दिल्लीचा मुख्यमंत्री केला पण हा दिल्लीच्या लोकांना दारू पाजतोय, असे सिंह म्हणाले.

कोविड काळात याने दिल्लीतील लोकांना ऑक्सिजन दिला नाही, पण आता दारु देत आहे, असे परवेश साहिब सिंह म्हणाले. यावेळी बोलताना सिंह यांनी केजरीवालांचा एकेरी उल्लेख देखील केला आहे.

दरम्यान परवेश सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाला एक विनंती केली आहे. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला खोचक शब्दांत विनंंती केली आहे.

मला नाही वाटत की, केजरीवाल यांना समजावण्याची हिंमत त्यांच्या पक्षात कोणाची असेल. त्यामुळे मी श्रीमती केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी त्यांना योग्य मार्गावर आणावे. आणि तेच त्यांना योग्य मार्गावार आणू शकतात.

महत्वाच्या बातम्या – 

मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता

‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका

“मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावे लागत आहे”, काँग्रेसचा खोचक टोला

“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा