औरंगाबाद महाराष्ट्र

‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण

औरंगाबाद | आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भागवत कराड यांच्या मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातील महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. या वॉर्डात तू का काम करतोस? भाजपकडून फक्त आम्हीच काम करणार, अशी धमकी देण्यात आली. यानंतर घरात घुसून मारहाण करण्यात आली, असं कुणाल मराठेकडून सांगण्यात आलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण कुणाल मराठेला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ही घटना काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमरास घडली आहे.

औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, असा दावा कुणाल मराठे या तरुणाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”

-खासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती

-“हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”

-PMPML च्या 2100 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार नाही

-राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य