देश

अर्थव्यवस्था उध्वस्त करायला देखील डोकं लागतं; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

Subramnian SwamyPTI 660

नवी दिल्ली |  भारतीय अर्थव्यवस्था सध्या संकटात सापडली आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपला लक्ष्य करतोय. आता यावरून भाजपमधल्याच लोकांनी स्वपक्षावर टीका करायला सुरूवात केली आहे. अर्थव्यवस्था उध्वस्त करायला देखील डोकं लागतं, अशा शब्दात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

सामान्यपणे मंदी महागाईसोबत येत नाही. मागणीत घट झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत वाढ होत नाही. मात्र आता भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता या त्रुटी उघड्या पडताना दिसून येत आहे. अश्या प्रकारे अपयशी ठरायला देखील डोकं लागतं, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे.

सुब्रमण्यम स्वामींनी ट्वीट करून अर्थव्यवस्थेची दुर्दशा मांडली आहे. अर्थव्यस्थेची अशी अवस्था करायला डोकं लागलं, असं आपण गमतीने म्हणत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, याअगोदर सतत कोसळणाऱ्या रूपयावर भाष्य करताना स्वामींनी अजब सल्ला दिला होता. लक्ष्मी मातेचं चित्र नोटांवर छापा, असं ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांमुळे बहुजन समाजाचे सरकार आले- शाहू महाराज

-काँग्रेस पलटलं… दलवाईंनी राहुल गांधींना तोंडावर पाडलं; म्हणतात, सावरकरांचा स्वातंत्र्यासाठीचा त्याग मोठा

-पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? अजित पवार यांचं खास शैलीत उत्तर

-तुम्ही इथले प्रमुख… मी तुम्हाला स्वत: खुर्चीत बसवलंय; मुख्यमंत्र्यांच्या आदराने तहसीलदार भारावले

-आभाळाएवढा बाप गेल्याचं दु:ख निबंधातून मांडणाऱ्या मुलाला मंत्री धनंजय मुंडे करणार मदत!