भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”

मुंबई | कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीनं अवघ्या जगामध्ये धुमाकुळ घातला आहे. काही महिन्यांखाली कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता.

सध्या ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सर्वांची चिंता वाढवली आहे. सर्वत्र परत एकदा निर्बंध लावले जाणार अशी चर्चा चालू झाली आहे. परिणामी सध्या चिंतेचं वातावरण आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण तयार झाले आहेत. अशात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पार्टी करण्यास बंदी घातली गेली आहे. ओमिक्राॅन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं सरकारनं काही क्षेत्रात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोना रूग्णांचा आकडा वाढू नये म्हणून सरकारन नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात रात्री नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे.

भाजप नेते आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा आहे, अशी टीका विखे यांनी सरकारवर केली आहे.

राज्यात सध्या निर्बँधाची गरज नाही. लग्न समारंभ होत राहतील आणि ते झालेच पाहीजेत. याबद्दल कोणाला दंड आकारण्यात येवू नये, असंही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

समारंभाला लोक येतात ते त्यांच प्रेम आहे. पण आल्यावर नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळावेत, मास्क घालावेत, सुरक्षित अंतर राखणे, या गोष्टी करण्यात याव्यात, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

सरकारनं 30 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान पार्ट्यांना बंदी घातली आहे. गर्दी टाळण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सुचना सरकारनं दिल्या आहेत.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात भाजपला सरकारचा निर्णय पसंत नाही का अशी चर्चा होत आहे. सुजय विखे पाटलांना त्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीकेचा समना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

 नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 ‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई

 “नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”