‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

सातारा | भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेनेतील बंडाच्या आणि शिवसेना (Shivsena) कोणाची या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेत बंड झाले आहे का? असा मिश्कील प्रश्न भोसले यांनी केला. तसेच शिवसेनेची स्थापना शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) नावे झाली आहे. मग मी म्हणावे का, शिवसेना माझी आहे? असे भोसले म्हणाले.

भोसले पुण्यात आले असता ते माध्यमांसोबत बोलत होते. शिवसेनेत बंड झाले याबाबत मला काही माहित नाही, असे देखील भोसले म्हणाले. शिवसेना आहेच, शिवसेना कुणाची यावरुन सध्या वाद सुरु असल्याचे ते म्हणाले.

लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा असतो. जनता लोकशाहीच्या माध्यमातून कोणत्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनीधी मग ते आमदार (MLA) असोत वा खासदार (MP) निवडून जातात, असे भोसले म्हणाले.

हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणजे लोकांचा महाराष्ट्र आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“बंडाच्यावेळी शहिद झालो असतो”; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

दीपक केसरकरांचा बंडाबाबत खळबळजनक दावा, म्हणाले…

‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका

‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’

आरे कारशेडवरुन ठाकरे आणि फडणवीस यांची जुंपली; फडणवीस म्हणाले ‘ठाकरे आपल्या अहंकारा…’