‘हे’ तर कोट्याधीश जादूगार!; भाजपचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विभागात मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. पण निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच भाजपने राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.

निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सगळ्याच पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय पक्ष हे कायमच वेगवेगळे फंडे वापरत असतात. भाजपनेही सोशल मीडियाचा वापर करत राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मनसे विरोधात मोठं कँपेन सुरू केलं आहे.

विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भाजपने ‘रम्याचे डोस’ सुरू केले. भाजपच्या या रम्याने आता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी त्यांना ‘कोट्याधीश जादूगार’ म्हणत टि्वट केलं आहे.

विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भाजपने ‘रम्याचे डोस’ सुरू केले. भाजपच्या या रम्यानेकार्टून काढून त्याच्यातून राज ठाकरेवर भाजपने निशाणा साधला आहे. त्यामुळे याला आता मनसे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अरे काल मी जादूचे प्रयोग बघितले. त्या जादुगाराने 2 रुपयाचं नाणं एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची 2000 रुपयाची नोट झालेली दिसली. आम्ही बघतच राहिलो रे! छ्या…त्यात काय मोठं! ह्याला काय जादू म्हनतात होय…आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया न टाकता 20 कोटी काढून दाखवले.., असं म्हणत भाजपने राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-