राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा म्हणजे ‘प्रेतयात्रा’- रावसाहेब दानवे

जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची संभावना प्रेतयात्रा म्हणून केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जालना शहरात आली असताना दानवे जाहीर सभेत बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रांना जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. जनता काय पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या यात्रांकडे पाठ फिरवली आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस त्यांच्या पक्षातील नेते डॉ. पद्मसिंह पाटील गैरहजर होते. राष्ट्रवादीची यात्रा ही प्रेतयात्रा आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

जे. पी. नड्डा म्हणाले, मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी काँग्रेसकडून देशात मतपेटीचे राजकारण सुरू होते. भाजप सत्तेत आल्यावर तुष्टीकरणाचे राजकारण बंद झाले. काश्मीरच्या संदर्भातील 370 कलम रद्द करणे किंवा तीन तलाक प्रथा बंद करण्यास काँग्रेसने व्होट बँक समोर ठेवून विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

जालना जिल्ह्य़ात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करून मराठवाडा वॉटरग्रीडसारखी महत्त्वाची योजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे भाषणही यावेळी झाले. तत्पूर्वी भोकरदन येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या कामाचे कौतुक केले. संतोष दानवे सर्वात तरुण आमदार असून ‘बाप से बेटा सवाई’ आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-