“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

मुंबई | राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी रोहित पवारांवर जाहीरपणे टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या निष्ठावंतांबाबत रोहित पवारांनी न बोललेलंच बरं. महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात?, याचा आधी शोध घ्यावा. त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!, अशी टीका रोहित पवारांनी केली होती.

दरम्यान, आता राष्ट्रवादी-भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगणार आहे. राम कदम यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीतर्फे काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“भाजपच्या राष्ट्रीय वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, भाजपने जाहीर माफी मागावी”

पुणे हादरलं! पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवरा-बायकोची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

 

महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या- गिरीष बापट

कोरोनाग्रस्त मातेने आपल्या बाळाला जन्म दिल्यावर घेतला अखेरचा श्वास; बाळाचा अहवाल आला…

ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून पुण्याकडे रवाना!