“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ड्रग्सचं व्यसन असून ते तस्करी देखील करतात, असा गंभीर आरोप भाजप नेते नीलन कुमार कटील यांनी केला आहे. कटील यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे अगोदरच वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांनी मोदींबद्दल वक्तव्य केलेलं ट्विट हटवण्याच्या सूचना संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे, असं शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेलं असंसदीय ट्वीट खेदजनक असून काढण्यात येत आहे, असंही शिवकुमार यांनी सांगितलं. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर त्यांनी याची आठवण करुन दिली.

दरम्यान, राजकारणात राजकीय सुसंस्कृतपणा जपायला हवा असं मी काल म्हटलं होतं. माझ्या वक्तव्याशी भाजप नेते सहमत असतील तर ते राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याची ते माफी मागतील, असंही शिवकुमार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“सामान्य माणसाला अच्छे दिन यावे, महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय”

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा पडणार नाही- रामदास आठवले

‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’; ‘या’ नेत्याने उघड केलं गुपित

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल- छगन भुजबळ

‘आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही’; यशोमती ठाकूर अन् रवी राणांमध्ये खडाजंगी