मुंबई | मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण दिवेसंदिवस वाढत आहे. परिस्थिती चिंताजनक होत चाललेली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका भाजपने केली आहे. आता त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने इशारा दिला आहे.
कोरोनासंबंधित पुर्वानुभव कोणालाच नव्हता, म्हणून सुरुवातीच्या चुका माफ आहेत… पण 2 ते 3 महिन्याच्या अनुभवाने जर शहाणपण येतं नसेल तर चुकीला माफी नाही, असा इशारा भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी दिला आहे.
एखादं लहान मुलं जर बोबडे बोल बोलत असेल तर त्याचं अवश्य कौतुक होतं पण एखादा प्रौढ बोबडा बोलत असेल तर त्याची टिंगलच होते, अशा शब्दात अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना येऊन 60 दिवस झाले तरी राज्य सरकारने आणखी काही भरीव काम केलं नाही. त्यामुळे येत्या 22 तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करून आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचं भाजपने सांगितलं आहे.
एखादं लहान मुलं जर बोबडे बोल बोलत असेल तर त्याच अवश्य कौतुक होत पण एखादा प्रौढ बोबडा बोलत असेल तर त्याची टिंगलच होते.
कोरोनासंबंधित पुर्वानुभव कोणालाच नव्हता म्हणून सुरुवातीच्या चुका माफ पण २ ते ३ महिन्याच्या अनुभवाने जर शहाणपण येतं नसेल तर चुकीला माफी नाही माननीय मुख्यमंत्री जी— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) May 20, 2020
महत्वाच्या बातम्या-
-रेल्वेनंतर विमानसेवा देखील सुरू होणार, या तारखेपासून विमाने उड्डाण घेणार…
-फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा डाव- बाळासाहेब थोरात
-शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना, त्यावर निलेश राणेंची खोचक टिप्पणी
-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला
-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र