मुंबई | डॉ. अमोल कोल्हे ऐतिहासिक भूमिका करण्यात माहिर आहेत. गेले अनेक वर्ष ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. पण काहीच दिवसांपूर्वी त्यांना राष्ट्रवादीने शिरूर लोकसभेतून उमेदवारी दिली आणि ते जिंकूनसुद्धा आले. खासदार झाल्यावर देखील त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका सोडलेली नाही. त्यांचा अभिनय आणखीही चालूच आहे. मात्र अमोल कोल्हे संभाजी महाराजांची भूमिका फक्त पैसे मिळवण्यासाठी करत आहेत, असा आरोप भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे.
माधव भांडारी पुणे जिल्ह्यातल्या भाजपच्या विजय संकल्प बूथ मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. कोल्हेंवर तसंच राष्ट्रवादीवर जोरदार तोफ डागली.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायचे त्यांना पैसे मिळतात. भगव्याशी ते अजिबात प्रामाणिक नाहीयेत. फक्त पैसे मिळवण्यासाठीच ते भूमिका करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत भगवा लावू नका, असं पक्षाने म्हटल्यानंतर त्यांनी लगोलग पक्ष सोडायला पाहिजे होता. पण त्यांची बांधिलकी भगव्याशी नाही. त्यांची बांधिलकी कशाशी आहे, हे आता जनतेनेच ओळखून घ्यावे, असं भांडारी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माधव भांडारी यांच्या टीकेला खासदार कोल्हे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
रामदास आठवले यांना ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अॅवॉर्ड’ पुरस्कार प्रदान https://t.co/zNNIYTVROX @RamdasAthawale
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
उद्याचा महाराष्ट्र तरूणांच्या हातात द्यायचाय; पवारांचं सूचक वक्तव्य! https://t.co/FFBlLEeoTl @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
आपल्याकडे कार्यकर्त्यांचा दर्यासागर… संपत्तीच्या डोंगराला उध्वस्त करा- शरद पवार https://t.co/lOwb8HCd7E @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019