…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध

पुणे | सद्य परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दारु विक्री घातक आहे. त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा, असा सल्ला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध दर्शवला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दारु विक्री घातक ठरणार आहे. पुणे, मुंबईत दारु विक्रीची दुकानं बंद करायला हवीत. कारण सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दारु ही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे महसूल हा विषय बाजूला ठेवा आणि सामाजिक अंगाने विचार करा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. दारुविक्रीवरील उत्पादन शुल्क राज्याच्या तिजोरीत येणार असले, तरी रेड झोनमध्येही मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारचा आहे.

दरम्यान, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्येही मद्यविक्रीच्या दुकानांना सशर्त मुभा देण्याचं जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण

-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री

-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट

-….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण