साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांची शिवेंद्रराजे हटावची घोषणा

सातारा | राष्ट्रवादीतून भाजपत आलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे स्थानिक पातळीवर नवा वाद निर्माण झालाय. सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव ही भूमिका घेत सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांचा साताऱ्यात मेळावा पार पडला.

शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपचं तिकीट दिलं तर भाजपचा झेंडा हातात घेऊन त्यांना पाडण्याचं काम करु, असा इशारा पक्षश्रेष्ठींना भाजप बूथ प्रमुखांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, येत्या विधानसभेचं तिकीट दिपक पवार यांना द्यायचं की शिवेंद्रराजे यांना हा पेच पक्षासमोर निर्माण झाल्याचं दिसत आहे.