पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

पुणे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.

महिलांनी तिथे उपस्थितीत पुरूष पदाधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र विषय वाढेल आणि पक्षाची बदनामी होईल, असं सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यातं आल्याची माहिती मिळाली आहे.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्या महिला पदाधिकाऱ्यांचा पदर ओढत चिमटा काढल्याचा प्रकार घडला आहे.

गर्दीत हे कृत्य कोणी केलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. संबंधित महिलांनी हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थितीत पुरूष पादाधिकाऱ्यांना सांगितला असल्याचं समजतंय.

या  घटनेबाबत महिलांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर संताप व्यक्त करत या प्रकाराला वाचा फोडल्याने हा विषय समोर आल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!

-कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

-…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

-कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

-अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

IMPIMP