अमेरिकेहून परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत

नवी दिल्ली : आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यानंतर परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दिल्लीत हजारो कार्यकर्ते सज्ज आहेत. भाजपने मोदींच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

मोदींनी अमेरिकेत ज्या पद्धतीने देशाची शान वाढवली, पाकिस्तानचे वाभाडे काढले, त्या पार्श्वभूमीवर मोदींचं भव्य स्वागत होणार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. दिल्लीतील सातही खासदारांच्या उपस्थितीत रोड शोचं आयोजन करण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता मोदींचा ताफा पालम विमानतळाहून निघेल आणि पंतप्रधान निवासस्थानी जाईल.

दिल्ली पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. निम लष्करी दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मोदींचं विमानतळावर स्वागत करण्यासाठी 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी दिल्लीतील सर्व सात खासदार मोदींसोबत असतील. 

PM

महत्वाच्या बातम्या-