नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेना अन् राष्ट्रवादीला भाजपने डिवचलं!

मुंबई | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांचा हिरमोड होताना दिसत आहे. शिवसेना गोव्यात 12 जागांवर लढवत आहे. मात्र, सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं चित्र आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या 1.06% मतं आहेत.

नोटालाही या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला असून त्यापाठोपाठ काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे.

भाजपने मिळवलेल्या या विजयानंतर महाराष्ट्र भाजपने शिवसेना राष्ट्रवादीला डिवचलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला गोव्यात नोटा पेक्षाही कमी मते मिळाले आहेत.

यावरुनच भाजपने या दोन्ही पक्षांना डिवचलं आहे. महाराष्ट्र भाजपने ट्विट करत म्हटलं, या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटा सोबत असणार हे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ 

पंजाबने राखला आम आदमीचा ‘मान’; झाडूकडून काँग्रेसचा सुपडा साफ 

‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”