नागपूर | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. अशातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली. म्हणून आज आम्ही सत्तेपासून दूर आहोत. पण 2024 मध्ये भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि जनतेच्या आशीर्वादाने सत्ता येईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांंनी केलं आहे.
2024 मध्ये भाजपची सत्ता तीन पक्षांसोबत नव्हे एकहाती असेल. महाराष्ट्रचे तीन तेरा वाजवणारे तेरा पक्ष एकत्र आले तरी जनतेत असणारा आक्रोश, चांद्यापासून-बांद्यापर्यत जनता त्राहीत्राही झाली आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
संजय राऊत आणि शिवसेनेला मी धन्यवाद देईन की जर ते मागल्यावेळी सोबत आले असते तर त्यांनी बेईमानी केली नसती, तर 2024 मध्ये पुन्हा आम्हाला युतीचं सरकार आणावं लागलं असतं, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
भविष्यात आमचं एकट्याचं सरकार यावं आणि महाराष्ट्राची उन्नती व्हावी, त्यामुळं कुठेही स्पीड ब्रेकर कामात नसावा, या विचारानं त्यांनी आमच्याशी बेईमानी केली असावी, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, विरोधकांवर सुडबुद्धीने वागवत विरोधकांना कशा पद्धतीने संपवता येईल असा विचार असणार हे सरकार आहे, अशी टीका देखील मुनगंटीवार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष बनेल”
भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…
“बदाम खाऊन मला अक्कल आली की…”; अभिनेता अमेय वाघची पोस्ट चर्चेत
“शरद पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, हकालपट्टी झाल्यावर…”
ही दोस्ती तुटायची नाय! LIVE सामन्यात पोलार्डने घेतलं ड्वेन ब्राव्होचं चुंबन; पाहा व्हिडीओ