मुंबई | 26/11 च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवणाऱ्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजप करणार आहे. दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये गेले होते.
श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. भाजपतर्फे श्रीवर्धनकर यांना 10 लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
श्रीवर्धनकर चार दिवसांपूर्वी फूटपाथवर आढळले होते. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
दरम्यान, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई
-मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!
-रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा
-दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?
-“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”