भाजपने हात झटकले; म्हणतात त्या व्हिडीओशी आमचा काही संबंध नाही

मुंबई |  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं पुस्तक भाजपचे नेते विजय गोयल यांनी लिहिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रासह भारतात याचे जोरदार पडसाद उमटले. आता तो वाद मिटतो ना मिटतो तोच शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने शिवभक्त चांगलेच भडकले आहेत. यावर मात्र भाजपने हात झटकले आहेत.

‘पॉलिटिकल किडा’ या कुठल्याश्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या व्हीडिओचा भाजपशी काहीही संबंध नाही. तो भाजपचा अधिकृत व्हीडिओ नाही तसंच निवडणूक प्रचारात तो व्हीडिओ भाजपने वापरलेला देखील नाही, असं भाजपने म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याचं समर्थन भाजप कधीच करणार नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी दिलं आहे. दुसरीकडे हे जे कुणी केलंय त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजेंनी केली आहे.

दुसरीकडे, हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या व्हीडिओद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदींची तुलना करून महाराजांचा पुन्हा एकदा अपमान करण्यात आलाय. ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकानंतर हा प्रकार घडलाय. महाराजांचा असा वारंवार अवमान होत असतानाही आणि भाजप आणि नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का?, असा सवाल राष्ट्रवादीने विचारला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मुस्लिमांना पाकिस्तान, बांगलादेशातून पैसा मिळत असेल तर…- भाजप आमदार

-आता हे अति होतंय… लवकरात लवकर कारवाई करा; संभाजीराजे संतापले

-“शिवरायांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं, अपमान सहन केला जाणार नाही”

-“मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जे केलं ते खुलेआम केलं”

-काय करावं आता… वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत गेली घरातून पळून!!!