‘… त्याचेच परिणाम शिवसेनेला भोगावे लागतायत’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

पटना | भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (Janta Dal United) आघाडी सरकार नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाठिंबा काढून घेतल्याने कोसळले. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

त्याचबरोबर कुमारांनी आपल्याला राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसचा (INC) पाठिंबा असल्याचे पत्र देखील राज्यपालांना देत सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. आज दुपारपर्यंत ते नव्याने मुख्यमंत्री होणार आहेत.

त्यामुळे आता बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखे सत्तांतराचे वारे वाहत आहेत. परंतु महाराष्ट्राप्रमाणे बिहारमधील कोणताही पक्ष फुटला नाही. महाराष्ट्रात शिवसेना पक्षाचे ज्याप्रमाणे तीन तेरा वाजले, तसे बिहारमध्ये झाले नाही.

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन शिवसेना फोडली आणि त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता. त्यामुळे एकनाथ शिंदे जरी पडद्यावरचे कलाकार असले, तरी खरा सुत्रधार भाजपच आहे.

तशाच प्रकारचा धमकीवजा इशारा कुमार यांना भाजपच्या एका नेत्याने दिला आहे. सुशील मोदी (Sushil Modi) यांनी कुमार यांना आपण विश्वासघात करणाऱ्यांना फोडतो त्यांचा पक्ष संपवितो, असा इशारा दिला आहे.

नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलात मिळाला नसता, येवढा मान आम्ही दिला. आमच्या जास्त जागा असून देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले, आणि त्यांनी विश्वासघात केला, अशे सुशील मोदी म्हणाले.

तसेच नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा आम्ही कधी विचार केला नाही. ज्यांनी आमच्योसोबत विश्वासघात केला, त्यांना आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमच्यासोबत विश्वासघात केला त्यांचे परिणाम आज ते भोगत आहेत, असे देखील मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात काल (दि. 08) मंत्रीमंडळ विस्ताराची धामधूम सुरु असताना, तिकडे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. उद्या नितीश कुमार नव्या मित्रपतक्षांच्यासोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?

शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…

संघपरिवारातील संघटनेकडून शिंदे सरकारला विरोध?; महत्त्वाची माहिती समोर

गंभीर आरोप असलेल्या ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

मोठी बातमी! बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला जोर का झटका