“आगामी काळात भाजप स्वबळावर लढणार, कुणीही यावं अन्…”

मुंबई | 2019 साली राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी घडामोड घडली होती. महायुती तुटून महाविकास आघाडी तयार झाली होती. ज्याचे राज्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेनं सत्तेची सुत्र आपल्या हातात घेतली आणि राज्यात एका मोठ्या संघर्षाला सुरूवात झाली. भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष 2019 पासून महाराष्ट्र पाहात आहे.

राज्यातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र असायचे आता मात्र दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ताकतीनं लढत आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या पारंपारिक मतपेट्याही फुटत आहेत.

राज्यात येणाऱ्या काळात महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. परिणामी भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. परिणामी राज्याच्या राजकारणाच्या आणि मित्रपक्षांच्या दृष्टीनं भाजपचा हा निर्णय महत्त्वाचा आहे.

सातारा पालिकेसह सर्वच ठिकाणी भाजपतर्फे स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती सातारा भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी पत्रद्वारे दिली आहे.

भाजप कुणालाही आणि कुणासाठीही पर्याय नसल्याचं सांगितलं गेलं आहे. यासाठी एक कोअर कमिटी लवकरच बनवण्यात येणार असल्याचंही या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

कुणीही यावं आणि टपली मारून जावं, असं भाजप आता राहिला नाही. भाजप स्वत:च्या ताकतीवर सत्ता खेचुन आणू शकतो. परिणामी येणाऱ्या काळात भाजप साताऱ्याच्या माध्यमातून स्वबळावर लढण्याची चाचपणी करणार हे नक्की मानलं जात आहे.

साताऱ्यातील पक्षाचं संघटनं मजबूत असून त्यातील कोणीही इकडं-तिकडं गेलं नाही अथवा जाणार नाही, असंही गोसावी यांनी म्हटलं आहे. परिणामी भाजपनं सातारा नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी केल्याचं लक्षात येत आहे.

दरम्यान, गोसावी यांनी सातारा नगरपरिषद ताकतीनं लढवणार असं सागितलं आहे. पण साताऱ्याच्या दोन राजांमधील वाद भाजप कसा सोडवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा